मु पो : सणसवाडी
घराचे छत पडून पूर्ण झाले होते खरे पण घराचे काम आता कुठे सुरू झाले होते. पावसाळ्याची सुरुवात झाली होतीच. आता दोन fronts वरती काम होती. पहिलं तर मातीच्या घरात आतली कामं पूर्ण करणे जसे internal wall , माती मुरूम चे flooring, शेण मातीचे plastering, आणि शेणाने घर सारवणे इत्यादी. याचबरोबर शेतामध्ये पिकांची लागवड. जरी शेताच्या स्वरूपासाठी हात धुवून मागे नव्हतो लागलो पण एक regular पिक चक्र तर चालवायचे होते. मग घेवडा उडीद मूग नाचणी बाजरी यांची लागवड करणे. भाताच्या शेतीला त्या वर्षी पर्यंत सुरुवात केली नव्हती. कारण भात खाचरासाठी दगडी ताल घालायची बाकी होती. प्राथमिकतः घर आणि परिसर सुव्यवस्थित करायचे होते
घर बांधत होतो तेव्हा task oriented कामं होती. आता शेतावर राहात असताना छोटी छोटी न संपणारी भरपूर कामं असायची. घरातली + शेतातली.
मला शेतामध्ये विशेषतः चिखलात काम करण्याचा शून्य अनुभव होता. पायाला चिखल लागल्यावर जो एक uneasiness यायचा तो carry करायला शिकावं लागलं. हळूहळू त्याप्रती स्वीकृती बनायला लागली. मग तासंतासही चिखलात काम करू शकलो. करू शकतो. घरापुढे जो उतार होता त्याला आडवे दगड घालून terraces तयार केले. त्यात माती भरली. आणि मग त्यामध्ये अळू, मिरची, टोमॅटो, भेंडी लागवड केली. पावसाची सतत धार सुरू असताना शेतावर राहणे कष्टाचे होते. तसंच त्याची तृप्ती पण विशेष होती.
आमचे शेत गाव आणि forrest यांच्या अगदी बॉर्डरवर होते. आम्ही रानातच राहतो म्हणा ना ! मुख्य डोंगर रांगेची चार दऱ्यांमध्ये विभागणी केली आहे. जांभूळ दरा, जोगदरा, लक्ष्मीदरा, शेळके दरा. प्रत्येक दऱ्यामधून एक मुख्य ओढा वाहतो. त्या ओढ्याच्या प्रवाहाला दगडी भिंत घालून त्याचा वेग नियंत्रित करायचा. आणि ही दगडी भिंत म्हणजे दगडी ताल. एकावर एक दगड रचलेले कुठल्याही सिमेंट शिवाय. आणि अशी दगडी ताल घालून भाताची खाचरं तयार करतात. आणि हे खाचर तुंबवून पाणी पुढे पास करतात. आणि मग या खाचरामध्ये भाताच्या रोपाची लावणी करतात. साधारणपणे सह्याद्रीमध्ये पावसाळ्यातील भात शेती या पद्धतीने करतात.
आमचे शेत आणि घर येतं जोगदऱ्यामध्ये. या दर्याच्या प्रवाहातले पहिले भात खाचर आपलेच. डोंगराच्या जवळ असल्याची ही उपयोगिता. त्यामुळे सगळे डोंगर झऱ्याचे निर्भेळ निर्मळ पाणी प्यायला वापरायला मिळतं. अशा सह्याद्रीच्या कुशीत, हिरवळ दाटलेली असताना, भरगच्च पावसात सकाळचा पहिला चहा घ्यायचे मला भाग्य लाभले. भाग्यवान माणूस मी.
घरातली सगळी काम हळूहळू सुरळीत झाली. कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्याकरिता जागा आणि पाण्याची व्यवस्था evolve होत गेली. आदिती अपूर्वा शेणाने घर सारवायच्या. दररोज. तसेच घराच्या आतल्या बाजूला चुन्याच्या plastering ला सुरुवात केली. आता Multiple fronts वर काम सुरू होते. माझा अनुभव म्हणून सांगतो झोपेची क्वालिटी अगदी सुपर झाली होती.हा संपूर्ण काळ वर्षभराचा किंवा त्याहून थोडा जास्त असेल. या दरम्यान शेतावर अनेक वन्य मित्रांनी हजेरी लावली. त्यातल्या काहींचे फोटो आम्ही घेऊ शकलो ते शेअर करतो.
| praying mantis |
| bamboo pit viper/ चापडा |
| घोरपड |
| खापर खवल्या |
| डुरक्या घोणस |
यादरम्यान शेतासाठी विहीर आवश्यक आहे हे नक्की झालं होतं. आता त्यासाठीच्या तयारीला लागणे क्रमप्राप्त होते. विहिरीचे काम दोन टप्प्यात झाले. त्याचे तपशील मी पुढच्या पोस्टमध्ये शेअर करतो.